
Special Trains For Diwali
ESakal
मुंबई : दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असून, यंदा मध्य रेल्वेकडून विक्रमी १ हजार ६६२ उत्सव विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार ४३२ गाड्या मध्य रेल्वेच्या तर उर्वरित इतर रेल्वे झोनच्या आहेत. या सर्व गाड्यांपैकी आतापर्यंत तब्बल ७९.३७ टक्के आरक्षण पूर्ण झाले असून, बहुतेक गाड्या हाऊसफुल होण्याचा मार्गांवर आहेत.