

Big Relief for Passengers: Central Railway to Run Special Mumbai–Nagpur and Mumbai–Madgaon Trains on January 25
esakal
मुंबईतून नागपूर आणि मडगावकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेने वाढत्या गर्दीचा विचार करून २५ जानेवारीला दोन वेगळ्या मार्गांवर खास रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांमुळे मुंबईकरांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार असून, प्रवास अधिक सुलभ होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर दरम्यान तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान या गाड्या धावतील. प्रवाशांच्या मागणीनुसार ही व्यवस्था करण्यात आली.