
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने प्रवासी आरक्षण केंद्र (पीआरएस) मलकापूर येथे मोठी कारवाई करत बेकायदेशीर रेल्वे तिकिट विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. २२ मे रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन दलालांना अटक करण्यात आली असून, १० लाखांहून अधिक किमतीची १८२ रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.