केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार राज्याच्या दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या विभागांना बसला आहे. विदर्भातील कापूस, सोयाबीन या पिकांचेही नुकसान झाले आहे.

मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची पिके वाहून गेली आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणे अवघड बनले आहे. यासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारकडे मदत करण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर नुकसानीचा आढावा केंद्रीय पथक शुक्रवारपासून (ता. 22) तीन दिवस घेणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या विभागांना बसला आहे. विदर्भातील कापूस, सोयाबीन या पिकांचेही नुकसान झाले आहे. केंद्राचे पाच सदस्यांचे पथक तीन दिवसांच्या काळात विविध भागांत भेटी देतील, तसेच शेतकऱ्यांशीही चर्चा करतील. डॉ. व्ही. तिरुपुगल हे या पथकाचे नेतृत्व करतील. 

नव्या आघाडीचं ठरलं!

राज्यातील 94 हजार 53 हजार 139 हेक्‍टर क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. यामुळे एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत राज्याने केंद्राकडे 7,207 कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्यपालांनी नुकतीच खरिपासाठी हेक्‍टरी आठ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central squad To Inspect Crop Damage By Unseasonal Rain In Maharashtra