‘ॲग्रोवन’ मधील ‘चकाट्या’ही ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 September 2020

‘ॲग्रोवन’मधून ‘चकाट्या’ या व्यंगचित्रांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडणारे व्यंगचित्रकार लहू काळे यांची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रेखाटलेली सर्वाधिक ४ हजार ३४१ पॉकेट कार्टून २००७  ते २०१९ या कालावधीत ‘ॲग्रोवन’मधून सलग प्रसिद्ध झाली आहेत.

पुणे - ‘ॲग्रोवन’मधून ‘चकाट्या’ या व्यंगचित्रांद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडणारे व्यंगचित्रकार लहू काळे यांची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रेखाटलेली सर्वाधिक ४ हजार ३४१ पॉकेट कार्टून २००७  ते २०१९ या कालावधीत ‘ॲग्रोवन’मधून सलग प्रसिद्ध झाली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. याआधी भारतातील एकमेव कृषी दैनिक म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने ‘ॲग्रोवन’चा गौरव केला आहे.   

पुणे येथील केन्द्रीय विद्यालयात कला शिक्षक म्हणून काळे कार्यरत असून त्यांनी शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर रेखाटलेली ‘चकाट्या‘ ही पॉकेट कार्टूनस ‘ॲग्रोवन’मधून नियमित प्रसिद्ध होत आहेत. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakatya from Agrowon is also in the Limca Book of Records