Rain : मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाची शक्यता

राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा कडाका काहीसा कमी जाणवत आहे.
rain
rainesakal

पुणे - राज्यात उन्हाचे चटके जाणवत असतानाच, पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. तर विदर्भातही पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारा पडतील, असा इशाराही हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा कडाका काहीसा कमी जाणवत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह रविवारी (ता. ७) पावसाचा इशारा, तर सोमवारी (ता. ८) विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

तर, शनिवारी राज्यातील सोलापूरमध्ये ४२.४ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे होता. तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड यांसह विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वाशीम, वर्धा येथे तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक होता.

पुण्यात बुधवारी हलक्या पावसाची शक्यता

पुण्यात रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर गुढीपाडव्याच्यादिवशी (ता.९) आकाश अंशत: ढगाळ राहील. मात्र, बुधवारी (ता.१०) अंशत: ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पुण्यात कोरेगाव पार्क येथे ४१ अंश सेल्सिअस तापमानाची शनिवारी नोंद झाली. तर लोहगाव, चिंचवड, लवळे आणि मगरपट्टा येथे ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com