
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सरकारचं मोठं पाऊल; 'यांना' मिळणार महामंडळ
मुंबईः शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार प्रस्तावित आहे. परंतु त्यापूर्वी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळतेय.
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांची नाराजी समोर आलेली होती. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यातच शिंदे गटाच्या आमदारांचा नुकताच गुवाहटी दौरा पार पडला.
येणाऱ्या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जात आहे. परंतु त्यापूर्वी महामंडळांचं वाटप होण्याची शक्यता आहे. पहिल्या मंत्रिमंडळ वाटपावेळी जे नाराज होते, ज्यांना सभागृहाचा दांडगा अनुभव आहे किंवा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत; अशांपैकी ज्यांना मंत्रिमंडळात स्थान देता येणार नाही त्यांना महामंडळ मिळू शकतं. 'एबीपी माझा'ने याबाबत वृत्त दिले आहे. संभाव्य नाराजी दूर करण्यासाठी राज्य शासनाने पावलं उचलली असल्याचं बोललं जात आहे.