Chandani Chowk : इंजिनिअर्सचाही अंदाज चुकवणाऱ्या पूलाचं डिझाईन, बांधकाम कोणाचं? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandni Chowk Bridge

Chandani Chowk : इंजिनिअर्सचाही अंदाज चुकवणाऱ्या पूलाचं डिझाईन, बांधकाम कोणाचं? जाणून घ्या

पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातला पूल शनिवारी रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी जमीनदोस्त करण्यात आला आहे. स्फोटानंतर पुलाजवळ काही वेळ केवळ धुळीचे लोटच दिसत राहिले. हळूहळू धुळीचे लोट खाली साचले आणि चांदणी चौकातला पूल पडल्याचं दृश्य समोर होत. परंतु 600 किलो स्फोटकांनीही तुटला नाही.

स्फोटात पुल 50 टक्केच पडला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यानंतर पुलाच्या मजबुतीवर पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं होत. तर हा पूल साधारण 30 वर्षांपूर्वी बार्ली इंजिनिअर्स या कंपनीने काही लाखात बांधला होता. त्याचं डिझाईन PWD चं होतं. बार्ली ही अनंत लिमये आणि सतिश मराठे यांची कंपनी होती.

हेही वाचा: प्रेम सुरत मध्ये, हनिमून गुवाहाटी मध्ये मग लाचारांचा दसरा मेळावा महाराष्ट्रात का?

तेव्हा पूल उभा करणं मोठं चॅलेंज होतं. पण अतिशय सचोटीने काम करणाऱ्या टीमनं ते आव्हान पेललं. हा पूल बांधण्यासाठी बिहारचे मजूर होते तर PWD चे कुलकर्णी नावाचे एक प्रामाणिक अधिकारी होते. त्यांचं सुरुवातीपासून या कामावर बारीक लक्ष होतं. 1982 ते 2002 या काळात बार्ली या कंपनीने जवळपास 20 पूलांची बांधणी केलीय. आळंदीतला मंदिराकडे जाणारा पूलही त्यांनीच बांधला.

टॅग्स :Bridge