...तरीही ते केंद्रात मंत्री कसे होतात; चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar and Chandrakant Patil

...तरीही ते केंद्रात मंत्री कसे होतात; पाटील यांचा पवारांना टोला

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तिघाडी सरकारवर आरोप होत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तरी सरकार राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेच चालवत असल्याचे विरोधक म्हणत आहे. अशात ज्यांचे खासदार सहाच्यावर निवडून येत नाही, तरीही ते केंद्रात मंत्री कसे होतात हे लॉजिक मला समजत नाही, असे म्हणत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला हाणला.

मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जास्त आमदार निवडून आले. असे असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले. यामुळे भाजप सतत तिघाडी सरकारवर आरोप करीत असते. ज्यांचे खासदार सहाच्यावर निवडून येत नाही, तरीही ते केंद्रात मंत्री कसे होतात हे लॉजिक मला समजत नाही. यावर मी पीएच. डी. करीत आहे. मात्र, ती अजून पूर्ण झालेली नाही.

हेही वाचा: बकऱ्याऐवजी त्याने कापली माणसाची मान; रुग्णालयात मृत्यू

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कमी आमदार निवडून आले. त्यापेक्षा कमी आमदार शिवसेनेचे होते. राज्यात शिवसेनेचे कमी संख्याबळ असताना त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिले. आता ते शिवसेनेला गोव्यात निवडणूक लढा असे म्हणत उकसावत आहे. तेथेही आपली सत्ता येईल का? याचे शरद पवार (Sharad Pawar) गणित जुळवत आहेत, असेही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

संजय राऊत हे शिवसेनेचे की शरद पवारांचे?

शिवसेनेला गोण्यात निवडणूक लढ म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेस स्वतः मणिपूरमध्ये का लढत नाहीत हे कळत नाही आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की शरद पवार यांचे हेही कळत नाही, असेही भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

Web Title: Chandrakant Patil Bjp Sharad Pawar National Congress Party Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..