esakal | केंद्राची ऑफर नाकारण्याइतके पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant-patil-sharad-pawar-smile

'केंद्राची ऑफर नाकारण्याइतके पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : भाजपसोबत सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना केंद्रातून ऑफर मिळाल्याची माहिती होती. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''आमच्यासोबत सरकार बनवा अशी ऑफर पवारसाहेबांना केंद्राने दिली होती, तर ती ऑफर न स्विकारण्याइतके पवारसाहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनी केंद्रामध्ये सरकार असलेल्या पक्षासोबतच राज्यात सरकार बनविण्यास त्यांनी प्राथमिकता दिली असती.'', असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा: 'महाराष्ट्र रसातळाला गेलाय; सुळे, गोऱ्हेंसह चव्हाण गप्प का?'

राज्यात भाजप सरकार बनविण्यास उत्सुक नाही. आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. पण, शरद पवारांना केंद्रातून ऑफर मिळाली असती तर त्यांना केंद्रामध्ये असलेल्या पक्षासोबतच राज्यात सरकार बनविण्यास प्राथमिकता दिली असती. त्यांना काय म्हणायचं आहे हे सर्वसामान्य माणसांना नीट कळतं, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटतं की मीच मुख्यमंत्री आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत देखील चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. ''आजही जनता मी मुख्यमंत्री असल्यासारखीच अपेक्षा करतात. मराठवाड्यातील जनतेला असं वाटतं. आजही मला लोकांमध्ये गेल्यानंतर वाटतं की, मीच मुख्यमंत्री आहे. हे उद्धव ठाकरेंना जमत नाही'', असा फडणवीसांच्या बोलण्याचा अर्थ असल्याचे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

loading image
go to top