Chandrakant Patil l अजित पवार हुशार राजकारणी, वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा सणसणीत टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil,Ajit Pawar

अजित पवार हुशार राजकारणी, वेळ मारून नेतात-चंद्रकांत पाटील

निधी वाटपावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार हे हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात असा टोला त्यांनी लगावाला. तर न्यायासाठी करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी अक्षरशः आक्रोश करूनही त्यांना न्याय मिळाला नाही असा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला.

हेही वाचा: माजी राज्यमंत्र्यांसह 48 हजार समर्थक, कार्यकर्ते करणार राष्ट्रवादीत प्रवेश

ट्विट करत काय म्हणाले चंद्रकांत पाटील

काँग्रेसचे २५ ते २६ आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या इतर अनेक आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडत अर्थसंकल्पीय सत्रात बसणार नाही अस निवेदन उध्दव ठाकरे यांना दिलं. त्यामुळे या आमदारांची समजूत काढण्यासाठी २ हजार कोटींचा निधी देण्यात आला. असा निधी देता येत नाही. परंतु, अजित पवार हे अतिशय हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करक केली आहे.

हेही वाचा: सरकारने आता किमान समान कार्यक्रमावर काम करावं;पटोलेंच मुख्यमंत्र्यांना पत्र

करुणा शर्मा यांनी ज्यावेळी परळीमध्ये जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांच्या गाडीच्या डिकीत रिव्हाॅल्वर ठेऊन त्यांना १५ दिवस तुरूंगात टाकलं. न्यायासाठी करूणा शर्मा यांनी अक्षरशः आक्रोश करूनही त्यांना न्याय मिळाला नाही असेही ते म्हणाले.

Web Title: Chandrakant Patil Criticism Of Ajit Pawar Political

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..