Sanjay Raut l मी गावचा पाटील, कोल्हापूरी भाषेत बोलू का? चंद्रकांत पाटील

संजय राऊतांना सल्ला दिलेला नाही आणि त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही.
Chandrakant Patil on Sanjay Raut
Chandrakant Patil on Sanjay Rautesakal

कोल्हापूर: मी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील एका गावचा पाटील आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यापेक्षा भयानक बोलू शकतो. पण त्यांना कळेल म्हणून तशी भाषा वापरणे ही माझी संस्कृती नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी सोमवारी पुण्यात (Pune) पत्रकारांशी बोलताना दिले.

आम्ही संजय राऊतांना सल्ला दिलेला नाही आणि त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही. कोण आहेत संजय राऊत? काल परवा शिवसेनेत येऊन ते कोणाला शिकवत आहेत. आम्ही अनेक वर्ष उद्धवजींसोबत काम केलं आहे, त्यामुळे मैत्रीच्या नात्याने आम्ही उद्धवजींना सावध केलं असा टोला पाटलांनी लगावला

Chandrakant Patil on Sanjay Raut
Photo: अंबाबाई चरणी आदित्य ठाकरे नतमस्तक; राजकारणावर बोलणं टाळलं
Summary

संजय राऊत,काल परवा शिवसेनेत येऊन ते कोणाला शिकवत आहेत. आम्ही अनेक वर्ष उद्धवजींसोबत काम केलं आहे,

संजय राऊत यांनी त्यांच्या शिवराळ भाषेचे समर्थन करताना समोरच्याला कोणती भाषा कळते. त्या भाषेत आपण बोलतो असे सांगितल्याचे एका पत्रकाराने सांगितले व त्यावर प्रतिक्रिया विचारली त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी वरील उत्तर दिले.

तेलंगणाचे (Telangana)मुख्यमंत्री मुंबईत आले व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून भाजपाविरोधी प्रादेशिक पक्षांची आघाडी तयार करण्याची चर्चा केली. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले , २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असेच बिगर भाजपा पक्षांचे महागठबंधन तयार केले होते व आता भाजपाला बहुमत मिळणार नाही अशी हवा निर्माण केली होती. तरीही त्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या नेतृत्वात भाजपाच्या जागा वाढून पक्षाला ३०३ जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा आणखी वाढतील. पण भाजपाविरोधी पक्षांनी आशा ठेवायला आणि प्रयत्न करायला हरकत नाही. शिवसेनेला गोव्याच्या (Goa) गेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७९२ मते मिळाली होती तरीही यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाच असा टोला ही त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com