उद्धवजी आणि माझ्यात काहीच वाकडं नाही; चंद्रकांतदादांचा पलटवार

निवडणुकीपूर्वी एक युती आणि निवडणुकीनंतर एक युती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; राऊतांवर निशाणा
chandrkant patil, jayant patil
chandrkant patil, jayant patilGoogle

सांगली: महाराष्ट्राची संस्कृती ही खरे बोलणारी आहे. निवडणुकीपूर्वी एक युती आणि निवडणुकीनंतर एक युती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असा निशाणा संजय राऊतांवर (Sanjay Raut)भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी साधला. ते आज (ता.१५) सांगलीत (Sangli) बोलत होते. सांगली महापालिकेच्या प्रभाग 16 अ च्या पोटनिवडणुकीचे भाजपा उमेदवार अमोल गवळी यांच्या प्रचारार्थ आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Summary

महाराष्ट्राची संस्कृती ही खरे बोलणारी आहे. निवडणुकीपूर्वी एक युती आणि निवडणुकीनंतर एक युती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.भाजपा प्रदेशाध्यक्षांचा संजय राऊतांवर निशाणा

पुढे ते म्हणाले, उद्धवजी( Uddhav Thackeray) माझे चांगले मित्र आहेत. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, तर 70 दिवस ते जनतेपासून दूर का? गेली 70 दिवस मुख्यमंत्री हे जनतेला उपलब्ध होत नाहीत. त्यांनी जनतेला उपलब्ध व्हावे असा ही टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. घरात बसून 12 कोटी जनतेचे राज्य चालवता येत नाही अशी उपरोधिक टीकाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. प्रश्न विचारायला अक्कल लागत नसेल तर मग काम करा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आम्ही प्रश्नच विचाराहायचे नाहीत अशी दादागिरी आम्ही सहन करणार नाही असा इशाराही दिला.

chandrkant patil, jayant patil
Army Day : सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकला भारत-पाक सिमेवर

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हणाले, तोडा फोडा आणि राजकारण करा ही नीती तुमची आहे जनाधार असणाऱ्यांना बाजूला करायचे आणि जनाधार नसणाऱ्यांना सोबत घ्यायची ही तुमची नीती असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपला जातीयवादी म्हणणाऱ्या जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी जाणून घ्यावे की खरे जातीयवादी कोण आहेत.

उद्धवजी आणि माझे काही वाकडं नाही. उलट उद्धव जी माझे चांगले मित्र आहेत. जयंत पाटील यांनी हे जाणून घ्यावे की मी उद्धव ठाकरेंवर नाही तर मुख्यमंत्र्यांवर टीका करतो असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील (Jayant Patil)यांना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com