esakal | सत्तार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेत मोठा वाटा असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्तार यांनी नेमका का राजीनामा दिला याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. तसेच, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असे सांगितले. 

सत्तार यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर, शिवसेनेच्या कोणत्याच नेत्याकडे सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही, असे शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी स्पष्ट केलेले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारला पहिला धक्का बसला असून, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी झाल्यानंतर आज (शनिवार) पाच दिवस झाले अद्याप खातेवाटप झालेले नाही. खातेवाटपाला मुहूर्त मिळण्यापूर्वीच एका राज्यमंत्र्यांने राजीनामा दिल्याने मोठी नामुष्की ओढावली आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून अब्दुल सत्तार शिवसेनेकडून निवडून आले आहेत. काँग्रेसमधून ते शिवसेनेमध्ये गेले होते. 

उद्धव ठाकरेंना पहिला धक्का; अब्दुल सत्तार यांनी दिला राजीनामा

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापनेत मोठा वाटा असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्तार यांनी नेमका का राजीनामा दिला याबाबत माहिती नसल्याचे म्हटले आहे. तसेच, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, सरकारमधील मंत्र्यांनी याविषयी बोलावे, असे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेचे 'अर्जुनअस्त्र' म्यान; सत्तार राजीनाम्यावर ठाम