
ईमानदारी और सच्चाई का डर अच्छा है, ये डर होना जरुरी है; चंद्रकांत पाटलांचा टोमणा
'कारवाईच्या भीतीने काहीजण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना असा वाद चिघळला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. आपल्या कुकर्मांमुळे कधीतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने काहीजण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागलेत, असा टोमणा त्यांनी मारला आहे. आता त्यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलं आहे.
मागील काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील (Thackeray Govt.) अनेक नेत्यांवर ईडी आणि आयटीच्या छापेमारीची कारवाई सुरु आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांची नाव समोर आली आहेत. याशिवाय मुख्यमंत्री ठाकरे यांचे बऱ्याच निकटवर्तीयांचा यात सहभाग असल्याचे दिसत आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. आपल्यावरही ईडीची (ED) कारवाई होईल या भीतीने काहीजण आत्ताच आत्महत्येची धमकी देऊ लागले. इमानदारी आणि खऱ्याची भीती चांगली आहे. आणि याची भिती असलीच पाहिजे, असे ट्विट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा: "भाजपवाले फक्त..."; संजय राऊतांच्या भावाचं वादग्रस्त वक्तव्य
आव्हाडांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की नुसतं चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "जितेंद्र आव्हाड भावनिक आहेत. मी समजू शकते अशा गोष्टींच्या एका वडिलाला काय वेदना होतात. कुटूंबावर आरोप प्रत्यारोप करण्याची कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात पध्दत नव्हती. हे सर्व दुर्दैवी आहे. शरद पवार हे ५५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, आजपर्यंत त्यांनी कुणावर कोणतेही आरोप केलेला नाही, असे ही त्या म्हणाल्या. (Supriya Sule)
सदाभाऊ खोत यांची आव्हाडांवर टीका म्हणाले,
सदाभाऊ खोत यांनी आव्हाडांचे वक्तव्य ट्वीट करत त्यांच्यावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “हा जिजाऊ आणि शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आमच्या मुली इथेच मोठ्या होतील. हिजाब आणि बुरखा घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपण आपली मुलगी पाठवणार आहात का? असा सवाल सदाभाऊंनी केला होता. त्यावर आव्हाडांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “शिवरायांनी धाडसी राजकारण केले शत्रू च्या बायका मुलं मुलिंना छळले नाही.. उगाच त्यांचा कारभार आणि त्यांना बदनाम करू नका तशी शिकवण जिजाऊंची होती. राज्यपाल जेव्हा छत्रपतीं बद्दल बोलले तेव्हा कुठे होतात.
हेही वाचा: हंगामाची सुरूवात होण्यापूर्वीच धोनीने अचानक कॅप्टन्सी सोडली
'माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही’, असे वक्तव्य आपण बोलले नसल्याचे जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं. मात्र तरीसुध्दा या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून विरोधक आव्हाडांवर टीका करताना दिसत आहे.
Web Title: Chandrakant Patil Criticized On Maha Vikas Aghadi Ed Raid And Leaders Fear
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..