esakal | अजित पवार हुशार राजकारणी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला I Political News
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार हुशार राजकारणी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

काही ठिकाणी या बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका महाविकास आघाडी सरकराच्या नेत्यांनी केली.

अजित पवार हुशार राजकारणी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर - उत्तर प्रदेश येथील लखीमपूरमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेच्या विरोधात आज महाराष्ट्र बंद आहे. राज्याभरातील अनेक व्यापारीही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. काही ठिकाणी या बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका महाविकास आघाडी सरकराच्या नेत्यांनी केली. दरम्यान त्यांच्या या टीकेवर भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रीया दिली आहे.

हेही वाचा: 'निसर्गाला तिघांचं सरकार मान्य नाही, आजच्या बंदचा निषेध'

भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, अजित पवार हे हुशार राजकराणी आहेत. 'एमपीएससी'चा विषय निघाला की, ते एक फसवी घोषणा करतात. ३१ ऑगस्टच्या आधी एमपीएससीच्या सर्व जागा भरु अशी घोषणा त्यांनी केली होती. नंतर जागा म्हणजे काय तर बोर्डावरील जागा म्हणजेच नोकऱ्या असे उत्तर त्यांनी दिले आहे. काल पुन्हा त्यांनी अशीच हळूच एक घोषणा केली आहे. वेळ आली की शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू. आता वेळी कधी यायची? असा सावालही त्यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा: 'महाराष्ट्र बंदला बदनाम करण्यासाठी गालबोट लावण्याचा प्रयत्न'

पुढे ते म्हणाले, याबाबत कोणतीही संवेनशीलता नाही, कार्यवाही नाही मात्र या घटनेचा लखीमपूर किंवा उत्तरप्रदेशमध्ये कोणताही बंद नसताना राज्यभर बंद पाळण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तर तुम्ही समाधान देऊ शकणार नाही, पण लोकांमध्ये प्रचंड उद्रेक निर्माण झाला आहे. याचे परिणाम येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसत आहेत. कोरोनामुळे आधीच लोकांचे नुकसान झाले आहे. आता या बंदमुळे हा संताप वाढू शकतो. ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर यामुळे व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागत आहे. एका अर्थाने काय तर महाविकास आघाडी सरकार राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

loading image
go to top