चंद्रकांत पाटील यांनी माझी तसेच सरकारची बदनामी केली; म्हणून....

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 17 July 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथिक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. माझी तसेच सरकारची बदनामी केली आहे. याबाबत त्यांनी माफी किंवा दिलगिरी व्यक्त करावी, असे न केल्यास त्यांच्याविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करण्यात येईल, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील यांनी दावा केल्यानुसार अर्सेनिक अल्बम हे औषध दोन रुपये इतक्‍या कमी किमतीत मिळत असल्यास ते उपलब्ध करून द्यावे, यासाठी जिल्हा परिषदांना त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देऊ, असेही मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केले आहे. औषध खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा परिषदांना दिले आहेत. 

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला

बाजारात दोन रुपये दराने मिळणारे अर्सेनिक अल्बम ३० हे औषध राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने २३ रुपये दराने खरेदी केल्याची चुकीची माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांमार्फत देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. वास्तविक अशी कोणतीही खरेदी राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाने केलेली नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil defamed me and the government hasan mushrif