esakal | राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला
sakal

बोलून बातमी शोधा

In the state the result of class XII was 90.66 percent

- गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ४.७८ टक्क्यांनी जास्त
- कोकण विभागात सर्वाधिक, तर औरंगाबादचा सर्वात कमी निकाल
- पुणे विभाग ९२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर​

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला असून, राज्यातील ९०.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. दरवर्षी बारावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्यापासून साधारणपणे ७५ दिवसांत निकाल लागतो. परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा झाल्यानंतर तब्बल १२१ दिवसांनी विद्यार्थी आणि पालकांची निकालाची प्रतीक्षा अखेर गुरूवारी संपली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यंदाच्या निकालात कोकण विभागाचा ९५.८९ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर पुणे विभाग ९२.५० टक्के निकालासह राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. यंदा औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के असा सर्वांत कमी लागला आहे.
यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. बारावीची परीक्षा दिलेल्यापैकी ९३.८८ टक्के मुली आणि मुले ८८.०४ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थिंनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा ५.८४ टक्क्यांनी जास्त आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येतो. परंतु यंदा कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि त्याचा कालावधी वेळोवेळी वाढविण्यात आला. लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे यंदाच्या निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याचे मंडळाने सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निकालात खासगीरित्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ८६७ असून त्यातील ७२.०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.५७ टक्के लागला आहे.

विद्यार्थ्यांची आकडेवारी :
- एकूण नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी : १४ लाख २० हजार ५७५
- परीक्षा दिलेले विद्यार्थी : १४ लाख १३ हजार ६८७
- उत्तीर्ण विद्यार्थी : १२ लाख ८१ हजार ७१२
- निकालाची टक्केवारी : ९०.६६ टक्के

- नोंदणी केलेले पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी : ८६ हजार ७३९
- परीक्षा दिलेले विद्यार्थी : ८६ हजार ३४१
- उत्तीर्ण विद्यार्थी : ३३ हजार ७०३
- निकालाची टक्केवारी : ३९.०३ टक्के

शाखानिहाय निकाल (टक्केवारीत) :
शाखा : फेब्रूवारी-मार्च २०१९ : फेब्रूवारी-मार्च २०२० : तुलनात्मक स्थिती
विज्ञान : ९२.६० टक्के : ९६.९३ टक्के : ४.३३ टक्क्यांनी जास्त
कला : ७६.४५ टक्के : ८२.६३ टक्के : ६.१८ टक्क्यांनी जास्त
वाणिज्य : ८८.२८ टक्के : ९१.२७  टक्के : २.९९ टक्क्यांनी जास्त
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : ७८.९३ टक्के : ८६.०७ टक्के : ७.१४ टक्क्यांनी जास्त

विभागानुसार निकाल
पुणे :  ९२.५० टक्के
नागपूर : ९१.६५ टक्के
औरंगाबाद : ८८.१८ टक्के
मुंबई : ८९.३५ टक्के
कोल्हापूर :  ९२.४२ टक्के
अमरावती : ९२.०९ टक्के
नाशिक : ८८.८७ टक्के
लातूर : ८९.७९ टक्के
कोकण : ९५.८९ टक्के
.......

श्रेणीनिहाय निकाल :
- श्रेणी : विद्यार्थी संख्या
- ९० टक्के व त्यापुढे : ५,२६९
- ७५ टक्के व त्यापुढे : १,४३,४४१
- ६० टक्के व त्यापुढे : ५,१३,५७५
- ४५ टक्के व त्यापुढे : ५,७९,६६७
- ३५ टक्के व त्यापुढे : ४५,०२९

१०० टक्के आणि शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या
शाखा : १०० टक्के : शून्य टक्के 
विज्ञान : २ हजार ३१८ : २०
कला : ५८९ : ३१
वाणिज्य : ८६७ : १९
व्यावसायिक : ८७ : ०१


शिक्षकांच्या घरी जाऊन गोळा केल्या उत्तरपत्रिका : डॉ. शकुंतला काळे

"बारावीची परीक्षा झाल्यानंतर दरवर्षी साधारणत: ७० ते ७५ दिवसात निकाल जाहीर केला जातो. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने उत्तरपत्रिकेच्या तपासणी कामात अनेक अडचणी आल्या. दरवर्षी जिल्हा स्तर, तालुका स्तर एवढेच नव्हे तर शिक्षकांच्या घरी जाऊन तपासलेल्या उत्तरपत्रिका गोळा करण्यात आल्या आहेत."
- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

loading image
go to top