भगवा म्हणजे कोण भाजप की कॉंग्रेस? चंद्रकांत पाटलांचा CM ठाकरेंना सवाल I Kolhapur By Election 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

'कोल्हापुरात भगव्याला मतदान करा, भगवा म्हणजे कोण भाजप की कॉंग्रेस?'

भगवा म्हणजे कोण भाजप की कॉंग्रेस? चंद्रकांत पाटलांचा CM ठाकरेंना सवाल

कोल्हापूर - कोल्हापूरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेस कडे जाऊ नये. अविश्वासाने निर्माण झालेलं सरकार टिकवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अविश्वासानं सरकार स्थापन केलं असून अविश्वासानं त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आहे, असा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आज ते कोल्हापुरात बोलत आहेत.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे ; जाणून घ्या एका क्लिकवर

यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकप्रकारे भगव्याला म्हणजेच भाजपा मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. कोल्हापूरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेस कडे जाऊ नये ही आमची अपेतक्षा आहे. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी शिवसैनिकांनी त्याग करावा लागला आहे. भाजपाने हिंदुहृदयसम्राट केला असल्याच्या ठाकरेंच्या टीकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहेत, ते बनण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. हिंदुहृदयसम्राट ऐवजी तुम्हीच जनाब लावत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सरकार टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सरकार टिकवण्याचा शिवसेना आटोकाट प्रयत्न करत आहे. काही वेळापूर्वी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोल्हापुरात भगव्याला मतदान करा. भगवा म्हणजे कोण भाजप की कॉंग्रेस असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना उपस्थित केला

काय म्हणालेत मुख्यमंत्री ठाकरे

भाजपाचा नकली भगवा बुरखा आता फाडायला पाहिजे. भगव्याच्या रक्षणासाठी मैदानात उतरलो आहे असे भाजप म्हणतात. कोणता भगवा? उद्या भगव्यासमोर दुसरे रंग उभा करून तुम्ही भगवा म्हणाल पण आम्ही तो भगवा मान्य करणार नाही असे खडेबाल उद्धव ठाकरे यांनी सुनावले. देशामध्ये भारतीय जनता पक्षाने बनावट हिंदूहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. देशात फक्त एकच हृदयसम्राट आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला धावून येतो तोच हिंदू हृदयसम्राट असतो. घरी बसून, प्रेस काॅन्फरन्स घेवून हिंदूहृदयसम्राट होऊ शकत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला आहे. यावेळी वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

हेही वाचा: मर्दानं मर्दासारखं लढावं; CM उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Web Title: Chandrakant Patil Question In Kolhapur By Election Voting To Bhagava Means Congress Or Bjp To Cm Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top