मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे ; जाणून घ्या एका क्लिकवर

देशात दुसरा हिंदूहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला-उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray e sakal

कोल्हापूर: उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे शेवटचे अस्त्र म्हणून मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. 'उत्तर’च्या पोटनिवडणुकीतील प्रचाराची सांगता आज होत आहे. पंधरा दिवसांपासून विविध नेत्यांच्या सभांनी शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांच्यासह शिवसैनिकात नाराजी होती; पण गेल्या काही दिवसांपासून नाराजी दूर होऊन शिवसैनिक सक्रिय झाले आहेत. त्यातूनही असलेली नाराजी दूर व्हावी यासाठी शेवटचे अस्त्र म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या व्हर्च्युअल सभेचे आयोजन आज केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडले.

देशामध्ये भारतीय जनता पक्षाने बनावट हिंदूहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. देशात फक्त एकच हृदयसम्राट आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला धावून येतो तोच हिंदू हृदयसम्राट असतो. घरी बसून, प्रेस काॅन्फरन्स घेवून हिंदूहृदयसम्राट होऊ शकत नाही. तर प्रतिक्रियासम्राट होऊ शकतो असा निशाणा फडणवीस यांच्यावर साधला.

Uddhav Thackeray
रात्री झोपून देश समजत नाही, त्यासाठी... ; सदाभाऊंचा टोला

पुढे ते म्हणाले, हिंदूहृदयसम्राटांविषयी तुम्हाला एवढं प्रेम आहे तर मुंबईतील विमानतळाला नाव द्यायला विरोध का करताय असा प्रश्नही त्यांनी विचारला. भाजपाचा नकली भगवा बुरखा आता फाडायला पाहिजे असेही ते म्हणाले. भगव्याच्या रक्षणासाठी मैदानात उतरलो आहे असे भाजप म्हणते. कोणता भगवा? उद्या भगव्यासमोर दुसरे रंग उभा करून तुम्ही भगवा म्हणाल पण आम्ही तो भगवा मान्य करणार नाही असे खडेबाल त्यांनी सुनावले. यावेळी वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
मर्दानं मर्दासारखं लढावं; CM उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला आहे.

  • धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत.

  • आम्ही खोटं बोलण्यात कमी पडतो, परंतु खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही

  • जे रेटून खोटं बोलतात ते खरं वाटतं

  • भाजप कुस्तीत उतरली तर धाडी टाकतील, मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे

  • भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्वाला सोडलं असं नाही

  • भाजप म्हणजे हिंदुत्व नाही

  • युती आम्ही तोडली नाही, भाजपनं तोडली

  • शिवसेना समोरून वार करते, पाठून वार करणं शिवसेना करत नाही.

  • आम्ही विरोध केला तरी समोरून करतो आणि पाठिंबा दिला तरी उघडपणे देतो.

  • भाजपसारखी आम्ही छुपी युती करत नाही

  • आम्ही उघडपणे सर्व करतो, काळोखात काही करत नाही

  • 'भाजपनं काॅंग्रेसला छुपं मत दिलं होतं का?, खुलासा करा'

  • २०१९ मध्ये भाजपनं आपली मतं काॅंग्रेसला फिरवली?

  • 'भाजप प्रतिक्रिया सम्राट, हिंदूहृदय सम्राट बनू शकत नाही'

  • वरकरणी राजकारण करणारा मी नाही

  • नकली भगवा बुरखा फाडायला पाहिजे

  • देशात दुसरा हिंदूहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com