esakal | भाजप आमदार मंदा म्हात्रेंच्या 'त्या' वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

भाजप आमदार मंदा म्हात्रेंच्या 'त्या' वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी खंत व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करून देखील पक्षाकडून डावललं जातं असं मंदा म्हात्रे म्हणाल्या होत्या. आता त्यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत पाटील शनिवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मंदा म्हात्रे यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता त्यांनी म्हटले की, 'मंदा म्हात्रे यांचे काय म्हणणे आहे ते आम्ही ऐकून घेऊ.' मंदा म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटलं होतं की, 'महिलांना खूप संघर्ष करावा लागतो. मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा मोदी लाट असल्याचं म्हटलं गेलं. दुसऱ्यावेळी निवडून आले तेव्हा तर मोदी लाट नव्हती ना? माझं काम होतं , माझं कर्तृत्व होतं ते. मात्र महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं आणि ते पुढे येऊ द्यायचं नाही असे प्रकार होत आहेत.'

हेही वाचा: मी पण करेक्ट कार्यक्रम करणार, राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा

जालन्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले की, भाजपची ताकद आता वाढली आहे. भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन सर्व निवडणुका स्वबळावर लढवेल. मात्र मोदींच्या नावावर ज्यांनी मते मागितली आणि आमचा विश्वासघात केला अशा विश्वासघातक्यांसोबत आम्हाला काम करायचे नाहीय. आमच्यावर प्रेम करणाऱ्या पक्षांसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवू आणि जिंकून दाखवू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

loading image
go to top