राज्यपालांशी पुन्हा चर्चाच; भाजपचा सत्ता स्थापनेचा दावा नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

राज्याच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. पण, तरीही सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. यावर राज्यपालांशी चर्चा केली. आता भाजपचे वरिष्ठ नेते जो काय तो निर्णय घेतली, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. 

मुंबई : राज्याच्या जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. पण, तरीही सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. यावर राज्यपालांशी चर्चा केली. आता भाजपचे वरिष्ठ नेते जो काय तो निर्णय घेतली, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. 

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी पाटील म्हणाले,  'राज्याच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. पण, सत्ता स्थापनेला उशीर होत आहे. त्यामुळे आता कायदेशीर पर्याय काय आहेत? याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे वरिष्ठ नेते जो काय तो निर्णय घेतली.'

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरच नाही
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना, सुरुवातीला राज्यपालांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर, त्यावर नकार देत पाटील यांनी राज्यपालांसोबतच्या बैठकीची हिंदीतून माहिती दिली आणि त्यानंतर ते निघून गेले. पत्रकारांच्या एकाही प्रश्नाला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देण्यास नकार दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil said about Maharashtra government formation