चंद्रकांत पाटलांनी सरकारची काळजी करू नये - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांना झालेले दु:ख मी समजू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारबाबत त्यांनी फार काही काळजी करू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाटील यांना शुक्रवारी दिला. तेव्हाच, ‘कावळ्याच्या शापाने काय मरत नाही’, अशा शब्दांत पवार यांनी पाटील यांना टोला लगावला. 

पुणे - सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांना झालेले दु:ख मी समजू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारबाबत त्यांनी फार काही काळजी करू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाटील यांना शुक्रवारी दिला. तेव्हाच, ‘कावळ्याच्या शापाने काय मरत नाही’, अशा शब्दांत पवार यांनी पाटील यांना टोला लगावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजिलेल्या क्रीडा स्पर्धांचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद देऊ नये, अन्यथा मातोश्रीबाहेरच कॅमेरे लागतील, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध राहावे, असा सल्ला पाटील यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळात कुणाला संधी द्यायची याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील. मंत्रिमंडळाचा विस्तार ठरल्याप्रमाणे होईल. त्यात राष्ट्रवादीला आणखी एक महत्त्वाचे खाते मिळेल, याबाबत विश्‍वास आहे. कर्जमाफी नव्या सरकारने केल्याचे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे कुणी श्रेय घेण्याचा प्रश्‍न येत नाही. यासंदर्भात आमच्यात कोणताही वाद नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहे.’’ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर बोलण्यास पवार यांनी नकार दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil should not worry about the government ajit pawar