विरोधकांची जेव्हा गळती तेव्हाच मेगा भरती : चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)

सागर आव्हाड
Thursday, 12 September 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला पुन्हा फोडणी दिली.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीत कायम राहणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाला पुन्हा फोडणी दिली. उदयनराजे हे भाजपमध्ये येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच विरोधकांची जेव्हा मेगा गळती सुरु होईल तेव्हा पुन्हा मेगा भरती सुरू होईल, असेही ते म्हणाले. 

दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांचा पक्ष प्रवेश होईल, असेही त्यांनी म्हटले. यामुळे पुन्हा चंद्रकांत पाटलांनी उदयनराजे भोसले यांच्या भोवती संशयाचे वातावरण निर्माण केले.

पुण्यात ते गणेश विसर्जन मिरवणुकीत बोलत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री संपर्कात आहेत. दोघांचे नियमित संवाद सुरु आहेत. परवा दीड तास दोघांत संवाद झाला असून, त्यांना कार्यकर्त्यांशी अजून चर्चा करायची आहे. त्यानंतर पक्ष प्रवेश आणि राजीनाम्यावर निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. उदयनराजे कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत आणि ते भाजपमध्ये नक्कीच प्रवेश करतील, असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी मेगाभरतीऐवजी विरोधकांची जेव्हा मेगा गळती सुरु होईल तेव्हा पुन्हा मेगा भरती सुरू होईल, असे म्हटले.

उदयनराजेंचं ठरलं; भाजपप्रवेशाबाबत घेतला मोठा निर्णय

यंदाच्या गणेशोत्सवावर दुष्काळ आणि पुराचे सावट गणपती उत्सवावर होते. मात्र, दहा दिवस उत्साहात साजरा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना पराभूत करु असे म्हणणारा मी कच्चा राजकारणी नाही, तर 2024 लोकसभा ही आमचे लक्ष आहे.

रुपाली पाटील यांच्याशी दुष्मानी नाही

रुपाली पाटील यांच्याशी काही दुष्मानी नाही. डॉल्बीला विरोध नाही तर डेसिबल विरोध असल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrakant patil statement on Other Political Leaders BJP Entry