Chandrapur Lok Sabha 2024 Election Results: सुधीर मुनगंटीवारांना धानोरकरांनी दिला धक्का! चंद्रपूर पुन्हा काँग्रेसकडे

Chandrapur constituency Result 2024 Congress Pratibha Dhanorkar Winner : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे चारवेळा खासदार राहिलेले हंसराज अहिर यांचा बाळू धानोरकर यांनी पराभव केला होता. (BJP Sudhir Mungantiwar)
Sudhir Mungantiwar vs Congress Pratibha Dhanorkar
Sudhir Mungantiwar vs Congress Pratibha Dhanorkar

चंद्रपूर- चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा धानोरकर यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे दिग्गज सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवलाय. या मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचा होता. या मतदारसंघातून भाजपने वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलं होतं, तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर या मैदानात होत्या.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला राज्यात फक्त चंद्रपूरमध्ये जागा राखता आली होती. या जागेवर काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते. पण, त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना २०२४ साठी तिकीट देण्यात आले. त्यांनी देखील चंद्रपूर काँग्रेसकडेच राखला आहे.

उमेदवाराचे नाव ---------मिळालेली मतं------- मताधिक्य

१. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)---- ७,१८,४१९---२६०४०५

२. सुधीर मुनगंटीवार (भाजप) ----४५८००४

Sudhir Mungantiwar vs Pratibha Dhanorkar
Sudhir Mungantiwar vs Pratibha Dhanorkar

सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेसाठी फारसे इच्छुक नव्हते. पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे त्यांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली होती. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत. तसेच ते मंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली विकासकामे त्यांची जमेची बाजू होती. दुसरीकडे, बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे प्रतिभा यांना सहानुभूतीचा फायदा मिळत होता. शिवाय त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं देखील मतदारसंघात पाहायला मिळालं.

Sudhir Mungantiwar vs Congress Pratibha Dhanorkar
Nagpur Lok Sabha Election Results: नागपुरकर पुन्हा गडकरींच्या बाजूने की यावेळी विकास ठाकरेंना साथ?

सहा विधानसभा मतदारसंघ

चंद्रपूरमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यवतमाळमधील वणी, आर्णी आणि बल्लारपूर या तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. राजुरा आणि वरोरामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. प्रतिभा धानोरकर या वरोराच्या आमदार आहेत. सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूरचे आमदार आहेत. आपल्या मतदारसंघात त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत.

Chandrapur 2019
Chandrapur 2019

ओबीसींची मतं निर्णायक

चंद्रपूर हा ओबीसी बहुल मतदारसंघ आहे. प्रतिभा धानोरकर या कुणबी समाजातून येत असल्याने याचा त्यांना फायदा होईल असं बोललं जात होतं. शिवाय राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सर्वाधिक विरोध चंद्रपूरमधून झाला होता. त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने वातावरण तयार झालं होतं. ग्रामीण भागातून प्रतिभा यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

महत्त्वाचे मुद्दे-

- सुधीर मुनगंटीवार भाजपचे दिग्गज नेता

-प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने सहानुभूती

- ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात

-दारु बंदीचा मुद्दा चांगलाच गाजला होता

-भाजपच्या हंसराज अहिर यांची नाराजी

-मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध

Chandrapur issues
Chandrapur issues
Sudhir Mungantiwar vs Congress Pratibha Dhanorkar
Ramtek Lok Sabha Election Results: 'रामटेक'चा गड कोण सर करणार? पारवे की बर्वे, कोण झेंडा फडकवणार?

हंसराज अहिर नाराज

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे चारवेळा खासदार राहिलेले हंसराज अहिर यांचा बाळू धानोरकर यांनी पराभव केला होता. अहिर यांना २०२४ मध्ये तिकीट मिळण्याची अपेक्षा होती. पण, तिकीट नाकारल्याने ते काहीसे नाराज होते. त्यामुळेच त्यांनी सुधीर मुनंगटीवार यांना प्रचारादरम्यान फारशी मदत न केल्याचं बोललं जातं. २०१९ मध्ये बाळू धानोरकर यांना ५,५९,५०७ (४५.१८ टक्के) मतं मिळाली होती, तर हंसराज अहिर यांना ५,१४,७४४ (४१.५६) टक्के मतं मिळाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com