Video : बारामतीचं घड्याळ बंद पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंच्या कार्यक्रमात चाललंय काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule

Video : बारामतीचं घड्याळ बंद पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंच्या कार्यक्रमात चाललंय काय?

Chadrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Pune News : नामांतर वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; दवे-मिटकरी आमने-सामने

त्यात यंदा भाजपचा डोळा पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमध्ये विजयाचा झेंडा रोवण्याकडे आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी बावन्नकुळेंच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ शेअर करत हे आहेत हे आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे ! असे म्हणत चिमटा काढला आहे.

हेही वाचा: Shirdi Bus Accident : शिर्डी बस अपघातातील मृतांची ओळख पटली; चार वर्षांच्या चिमुरडीसह १० ठार

शरद पवारांचा बालेकिल्ल्याला खिंडार पाडत आगामी लोकसभेत भाजप जिंकणारचं असा दावा बावन्नकुळे यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी बावन्नकुळेंच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ ट्वीट केला आहे. ज्यामध्ये बावन्नकुळे उपस्थितांना संबोधित करताना ऐकू येत आहेत. तर भाजपचे इतर नेते कशा प्रकारे आनंद लुटत आहेत असा चिमटा मिटकरींनी काढला आहे.

मिटकरींनी व्हिडिओ ट्वीट करत म्हटले आहे की, हे आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे ! जे बारामतीत जाऊन घड्याळ बंद पाडणार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांच्या भाषणाचा आनंद लुटताना केंद्रीय मंत्री भागवत जी कराड व माननीय मंत्री श्री अतुलजी सावे.

हेही वाचा: Amol Mitkari : शिंदे गटाचे तीन आमदार संपर्कात; अमोल मिटकरी

भाजपकडून मिशन बारामतीची तयारी

दरम्यान आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पवारांचा बालेकिल्ला असणारी बारामती काबीज करण्यासाठी भाजपकडून मिशन बारामतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी नुकत्याच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आढावा दौरा केला होता. मात्र, बारामती जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंना ऐकण्यासाठी भाजप नेतेचं किती उत्सुक आहेत हे या व्हिडिओतून दिसून येत आहे.