Shirdi Bus Accident : शिर्डी बस अपघातातील मृतांची ओळख पटली; सात वर्षांच्या चिमुरड्यासह १० ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shirdi Bus Accident

Shirdi Bus Accident : शिर्डी बस अपघातातील मृतांची ओळख पटली; सात वर्षांच्या चिमुरड्यासह १० ठार

Shirdi Bus Accident Update : सिन्नर शिर्डी महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Video : बारामतीचं घड्याळ बंद पाडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या बावन्नकुळेंच्या कार्यक्रमात चाललंय काय?

अपघातातील १० मृतांपैकी ९ जणांची ओळख पटवण्यात यश आले असून, यात एका चार वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. दहा मृतांपैकी एकाची ओळख अद्यापपर्यंत पटू शकलेली नाही.

या अपघातात 18 जण जखमी असून त्यांच्यावर सिन्नर येथील दोन खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: Pune News : नामांतर वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; दवे-मिटकरी आमने-सामने

अशी आहेत मृतांची नावे

दीक्षा गोंधळी, वय 17, प्रतीक्षा गोंधळी, वय 45, श्रावणी बारस्कर, वय 35, श्रद्धा बारस्कर वय - 9, नरेश उबाळे वय 38, वैशाली नरेश उबाळे वय 32, चांदनी गच्छे, बालाजी कृष्ण महंती वय - 28, अंशुमन बाबू महंती वय 7, रोशनी राजेश वाडेकर वय 36 अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

हेही वाचा: CM Eknath Shinde: सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

तर, या भीषण अपघातात निधी उभळे, माया जाधव, प्रशांत मोहंसी, सिमा नेके, सपना डांगे, हर्षद वाडेकर, धनिषा वाडेकर, शिवण्या बवस्कर, आशा जयस्वाल, योगिता वाडेकर, योगीता वाडेकर, रंजना वोटले, सुप्रिया साहिल, ऋतीका रौंधळ, वषीराणी बेहरा, सुहास बवस्कर जखमी झाले आहेत. या सर्वांवर सिन्नर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात वर्षाराणी बेहरा वय - 31, योगिता संदेश वाडेकर वय - ३०, मयुरी महेश बाइत वय - 23, श्रुतिका संतोष गोंधळी वय - 42 आणि रंजन प्रभाकर पोटले वय - ४० हे गंभीर जखमी झाले असून, या सर्वांवर सिन्नर येथील यशवंत हॉस्पिलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: Shilpa Shetty : पन्नाशीतलं सौंदर्याचं 'हिरवं पान' म्हणजे 'शिल्पा'

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

दरम्यान, या भीषण अपघाता मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.