Chandrashekhar Bawankule : शरद पवार भोंदूबाबा, त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar News

Chandrashekhar Bawankule : शरद पवार भोंदूबाबा, त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला असं वादग्रस्त विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आलं की त्याची सुटका होत नाही, असंही बावनकुळे म्हणाले आहेत. ते साताऱ्यामध्ये बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत यायची स्वप्नं पाहू नयेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज साताऱ्यात होते. तिथे त्यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यानंतर त्यांची साताऱ्यात पत्रकार परिषद झाली. तिथे बोलताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर कठोर टीका केली आहे. यावरुन आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक राजकीय नेत्यांनी बावनकुळे यांच्या या विधानावरुन त्यांचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : राऊत – ठाकरेंची मातोश्रीवर गळाभेट अन् शेकडो शिवसैनिकांचे डोळे पाणावले!

बावनकुळे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत येण्याचं स्वप्न बघणं सोडलं पाहिजे. बेईमानीतून सत्ता बनवण्याचा प्रयत्न अडीच वर्षांपूर्वी केला होता. उद्धव ठाकरेंवर एक प्रकारे जादूटोणा करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. हा जादूटोणा राष्ट्रवदीने केला. मात्र आता आम्ही सतर्क झालो आहोत."

हेही वाचा - विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

पुढे हे जादूटोणा करणारे भोंदूबाबा कोण असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, "हे भोंदूबाबा कोण हे पूर्ण देशाला आणि राज्याला माहित आहे. शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला तर त्याची सुटका होत नाही." तसंच २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, त्यामुळे आता राष्ट्रवादीने सत्तेत यायचा विचार करू नये, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.

टॅग्स :Sharad Pawar