
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेत ३० लाख घरांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीवरील ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातही वाढ होणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.