RTE जागांसाठीच्या प्रतीक्षा यादीत बदल; पालकांमध्ये गोंधळ

students
students
Summary

खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव ठेवलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची प्रतीक्षा यादीतील क्रमवारी अचानकपणे बदलली गेल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे

पुणे- खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत राखीव ठेवलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची प्रतीक्षा यादीतील क्रमवारी अचानकपणे बदलली गेल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे. प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावे क्रमवारीत मागे-पुढे झाल्याचे दिसून आले. प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने आधीच चिंतेत असलेल्या पालकांचा ताण क्रमवारीतील अनपेक्षित बदलामुळे आणखी वाढला आहे. (Changes in the waiting list for RTE seats Confusion among parents)

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमधील प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८४ जागांकरिता तब्बल दोन लाख २२ हजार ५८४ अर्ज आले असूल निवड यादीत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांनी निवड झाली आहे. निवड यादीबरोबरच प्रतीक्षा यादीही जाहीर केली आहे. परंतु प्रतीक्षा यादीत दिलेल्या क्रमवारीत काहीसा बदल झाल्याचे निदर्शनास येत आहे. काही शाळांमधील प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे क्रमवारीत मागे- पुढे झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायला मिळते. कोरोनामुळे उद्‌भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सध्या ही प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. मात्र, तरीही हजारो पालक प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना आपल्या मुलांचे नाव प्रतीक्षा यादीच्या क्रमावारीत पुढे-मागे होत असल्याने पालकांची चिंता वाढत आहे.

students
Corona Update: राज्यात 44 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त

शिक्षण विभागाचे म्हणणे :

प्रतीक्षा यादीतील चौदाशे विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम केला दुरूस्त

‘‘आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करताना संबंधित शाळेपासून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे राहण्याचे ठिकाण यावरून प्राधान्यक्रम ठरविला जातो. म्हणजेच शाळेपासून एक किलोमीटरच्या आत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात आधी प्राधान्य दिले जाते. त्यानंतर दीड, दोन, तीन किलोमीटर अशा प्राधान्यक्रमानुसार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली जाते. परंतु यंदा नियोजित प्राधान्यक्रमानुसार प्रतीक्षा यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे कालांतराने त्यात दुरूस्ती करून पुन्हा सुधारित यादी जाहीर करण्यात आली. तांत्रिक कारणांमुळे काही शाळांच्या प्रतीक्षा यादीमधील जवळपास चौदाशे विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम याप्रकारे बदलला गेला होता, तो आता दुरूस्त करण्यात आलेला आहे.’’, असं प्राथमिक शिक्षण संचालनालय सहसंचालक दिनकर टेमकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com