Corona Update: राज्यात 44 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त; 555 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहे.

Corona Update: राज्यात 44 हजार 493 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 29 हजार 644 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 44 हजार 493 रुग्णांनी विषाणूला हरवलं असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 555 रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 लाख 27 हजार 092 झाली आहे, तर 50,70,801 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनाला हरवलं आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 3 लाख 67 हजार 121 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे राज्यात 86 हजार 618 रुग्णांचा मृत्यू झालाय. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (maharashtra Corona Update active cases health ministry rajesh tope)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचे संकेत! लहान मुलांच्या संख्येत चौपट वाढ

राज्यात आज 555 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण 555 मृत्यूंपैकी 369 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 186 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील 708 मृत्यू पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यू संख्येत 707 ने वाढ झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,24,41,776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,27,092 (17.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 27,94,457 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top