सातबारामध्ये होणार तब्बल एवढे बदल; बदलांमुळे सामान्यांना मिळणार दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 5 September 2020

जवळपास आठ दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अमलात येणार असून, आता सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सातबारावर वॉटर मार्कसह सरकारचा लोगो आणि क्‍यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

मुंबई - जवळपास आठ दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अमलात येणार असून, आता सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सातबारावर वॉटर मार्कसह सरकारचा लोगो आणि क्‍यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत राज्यातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ब्रिटिश काळात एम. जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या हस्तलिखितामध्ये १९४१ मध्ये एम. जे. देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास ८ दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अमलात येत असून, सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. 

राज्यात मूग १५०० ते ८९४० रूपये;  पुण्यात ब्रॅंडेड मुगाला ७५०० ते ८५०० रुपये 

सातबारातील नवीन बदल

  • यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर ७ अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 
  • गाव नमुना नंबर ७ मध्ये गावाच्या नावासोबत स्थानिक सरकारचा कोड (एलजीडी) दर्शविण्यात येणार आहे. 
  • लागवड योग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. 
  • हेक्‍टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार.
  • दफ्तर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील.
  • सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल.
  • Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: changes that will take place in Satbara will bring relief to the common man