'Chhaava' Film Faces Defamation Allegations from Ganoji Shirke's Descendants : छावा चित्रपट इतिहासाची तोडमोड करून प्रदर्शित करण्यात आला आहे. कोणताही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नसताना राजे शिर्के घरणाऱ्यावर आरोप करण्यात आले आहेत. हा आमची बदनामी करण्याचा कट आहे, असा आरोप गणोजी शिर्के यांचे वंशज दीपकराजे शिर्के यांनी केला आहे. तसेच या चित्रपटात गणोजी शिर्के यांना जाणीवपूर्वक फितूर दाखवण्यालं असून ती दृष्ट वगळावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिर्के कुटुंबीयांचे वंशज दीपक राजे शिर्के आणि इतरांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.