Chhagan Bhujbal on Maratha reservation
Chhagan Bhujbal on Maratha reservation

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी बोलावली बैठक! सर्वपक्षीय, संघटनांच्या दलित-ओबीसी नेत्यांना केलं आवाहन

मराठा आरक्षणविषयक मागण्या राज्य शासनानं मान्य केल्यानंतर भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणविषयक मागण्या राज्य शासनानं मान्य केल्यानंतर भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्या आपल्या सिद्धटेक या बंगल्यावर सर्व पक्षीय दलित-ओबीसी नेत्यांना सर्व अभिनेवेश बाजुला ठेऊन उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. (chhagan bhujbal called meeting appeal to dalit obc leaders from all parties regarding maratha reservation)

भुजबळ म्हणाले, "उद्या संध्याकाळी ५ वाजता सरकारी निवासस्थानी दलित, ओबीसी नेत्यांनी मग ते कुठल्याही पक्षाचे संघटनेचे असतील, नसतील त्यांनी अभिनिवेश सोडून सिद्धगड बंगला इथ यावं, आपण यावर चर्चा करुयात. यामध्ये कुणालाही कमी लेखण्याचा प्रश्न नाही. चर्चा करुयात यावर पुढे काय पावलं उचलायची ते ठरवू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com