esakal | 'तुमचा भुजबळ करू' म्हणणाऱ्यांना भुजबळांचा टोला, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

'तुमचा भुजबळ करू' म्हणणाऱ्यांना भुजबळांचा टोला, म्हणाले...

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

मुंबई : राज्यात अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. विरोधकांकडून आरोप करताना अनेकदा 'तुमचा भुजबळ करू', अशी धमकी दिली जाते. विशेषतः किरीट सोमय्या यांनी हे वक्तव्य अनेकदा केले आहे. आता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात (maharashtra sadan scam case) मंत्री छगन भुजबळ (minister chhagan bhujbal) यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. त्यानंतर अशा धमक्या देणाऱ्यांना भुजबळ यांनी टोला लगावला आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्त झाल्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

तुमचा भुजबळ करू, असे अनेकजण धमक्या द्यायचे. आता ज्यांना त्रास दिलाय ते सुद्धा माझ्यासारखे मुक्त होतील. त्यांना सुद्धा न्यायालयाकडून न्याय मिळेल. कारण न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आता मला समाधानाची निश्चित झोप लागेल. यापूर्वीही लागायची. पण काही लोक जाणीवपूर्वक शांतपणे झोपू देणार नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

अनेक वर्षांपासून मला महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा केल्याच्या नावाखाली खटला सुरू होता. मात्र, आता न्यायालयाने आम्हाला दोषमुक्त केलं आहे. या लोकांनी चालविलेल्या कटकारस्थानातून आम्ही मुक्त झालो आहोत. आम्हाला मनापासून आनंद झाला आहे. शरद पवार, जंयत पाटील, अजितदादा पाठीशी उभे राहिले, त्यांचा सर्वांचे आभार. मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रिमंडळात घेतले. त्यांना माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांचे देखील आभार मानतो. मला न्यायदेवतेने मोठा दिलासा दिला आहे. त्याचा आनंद आहे, असेही भुजबळ म्हणाले.

द्वेषबुद्धीने माझ्यावर खटले दाखल केले. आठ खटले कशासाठी टाकले? याचे उत्तर द्यावे. सर्वच खट्ल्यातून मुक्ततात मिळेल. निश्चितपणे न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. मुख्य खटला हा महाराष्ट्र सदनाचा होता. आता त्यात दोषमुक्त झालो. शरद पवार कठीण काळात सोबत होते. त्यामुळे त्यांना पहिली बातमी सांगितली. वर्षा बंगल्यावर जाऊन शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही आनंदाची बातमी दिली, असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top