Chhagan Bhujbal : भुजबळांच्या मनात अजूनही खदखद? पक्षाच्या अधिवेशनादरम्यान म्हणाले, ''अश्रद्ध वागणूक दिली...''

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशासाठी छगन भुजबळ आज शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादही साधला.
Chhagan Bhujbal Expresses Displeasure
Chhagan Bhujbal Expresses Displeasure esakal
Updated on

Chhagan Bhujbal Expresses Displeasure : राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. त्यांनी अनेकदा त्यांची नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. तसेच त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकाही केली. दरम्यान, आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ''मी श्रद्धेनं आलो पण मला ‘अश्रद्ध’ वागणूक दिली'', अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com