छगन भुजबळांची तुरुंगातून सुटका 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - दिल्लीतील "महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्षात रविवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मात्र, त्यांना पुढील तीन-चार दिवस रुग्णालयातून हलवू नये, असा सल्ला केईएम प्रशासनाने दिला आहे. 

भुजबळ यांच्या सुटकेची कायदेशीर कागदपत्रे घेऊन पोलिस रविवारी केईएम रुग्णालय गेले आणि कागदपत्रांवर भुजबळांच्या सह्या घेतल्या. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याने भुजबळांना रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही. मात्र, उपचार सुरू असल्याने भुजबळांना घरी सोडायचे की नाही, याचा निर्णय केईएमचे डॉक्‍टर घेणार आहेत. घरी आल्यानंतर भुजबळ कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. सोमवारी (ता. 7) भायखळा येथे एका कार्यक्रमात भुजबळ कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असा मेसेज शनिवारी (ता. 5) सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, काही वेळेतच हा कार्यक्रम रद्द झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal gets released from jail