OBC आरक्षणावरूनच छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली होती..

ओबीसी आरक्षणावर बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे छगन भुजबळ शिवसेनेवर नाराज होत गेले.
Chhagan Bhujbal latest political news
Chhagan Bhujbal latest political news
Updated on
Summary

ओबीसी आरक्षणावर बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे छगन भुजबळ शिवसेनेवर नाराज होत गेले.

महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi Government) नेमलेल्या बांठिया आयोगाचा (Banthia Commission) अहवाल राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) स्वीकारला आहे. तसंच ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Chhagan Bhujbal latest political news)

महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कायदेशीर लढा दिला होता. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार होत्या. परंतु, राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या निवडणुकांना स्थगित दिली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं येत्या दोन आठवड्यांमध्ये निवडणुकीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

Chhagan Bhujbal latest political news
भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी?, शिंदेंकडून 50 लाखांचा निधी घेत भाजपात प्रवेश

दरम्यान, याच ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ यांनी शिवसेना फोडली होती. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेना फोडण्याची कामगिरी सर्वप्रथम छगन भुजबळ यांनी करून दाखवली होती. ऐंशीच्या दशकात छगन भुजबळ हे सेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात विधानसभेत सेनेचे ते एकमेव आमदार होते, मात्र तरीही विरोधी बाकांवरून भुजबळांनी शिवसेनेची भूमिका कणखरपणे बजावली आणि तत्कालीन काँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडले होते.

तो काळ मंडल आयोगाच्या आंदोलनाचा होता. ओबीसी आरक्षणावर बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे छगन भुजबळ शिवसेनेवर नाराज होत गेले. काँग्रेसचे नेते असणाऱ्या शरद पवार (sharad pawar) यांच्याशी त्यांचं जवळकीच नातं निर्माण झालं. भुजबळांच्या नाराजीला पवारांनी बळ दिलं आणि यातूनच १९९१ सालच्या नागपूर अधिवेशनावेळी भुजबळांनी शिवसेनेतील १८ आमदारांना घेऊन बंड पुकारलं होतं.

Chhagan Bhujbal latest political news
सांगली महापालिकेत त्रिशंकू; काँग्रेस-राष्ट्रवादीला ब्रेक, भाजपात उत्साह

शिवसेनेत यापूर्वी बंड हा शब्द उच्चारणेही गुन्हा होता. या बंडानंतर छगन भुजबळांना गद्दार म्हणून घोषित करण्यात आलं. त्यांना जीव वाचवण्यासाठी काँग्रेस आमदारांच्या संरक्षणाखाली लपून राहावं लागले. तरीही शिवसेनेचे ६ आमदार परतले आणि भुजबळांनी १२ आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भुजबळांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं होतं.

या बंडानंतर कित्येक वर्षे छगन भुजबळ आणि शिवसेना यांच्यातील नाते टोकाचे राहिले. बाळासाहेबांनी त्यांना लखोबा लोखंडे ही उपमा दिली होती तर भुजबळ त्यांना टी बाळू हे संबोधन दिलं होतं. असे कटू वातावरण होते तरीही एकदा 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी बाळासाहेबांना त्यांच्या मुलाखतीमध्ये भुजबळांसंबंधी प्रश्न विचारला होता. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना, बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की, छगन भुजबळ यांना थांबवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, मात्र ते थांबले नाहीत आणि शिवसेनेतील पहिलं बंड घडलं.

Chhagan Bhujbal latest political news
पुन्हा माझ्या नादी लागू नका, तोंडावर आपटाल; चित्रा वाघ यांचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com