chhagan bhujbal mla dattatray bharane
sakal
पुणे - ‘मंत्रिमंडळाच्या अगोदर घेतल्या जाणाऱ्या बैठकीत छगन भुजबळ स्वतः हजर होते. मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयावर ते नाराज नाहीत. त्यानंतरच्या बैठकीवेळी त्यांना अन्य काम असेल. त्यामुळेच ते हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला असे नाही. ते आमच्यासोबतच आहेत.’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.