Maratha Reservation
Maratha Reservationesakal

Maratha Reservation : ''500 कोटी द्या अन् माझी मालमत्ता घेऊन जा'', जरांगेंचा नामोल्लेख टाळत भुजबळ बोलले

Published on

नाशिक : ‘‘माझ्याकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याची टीका केली जाते. आता बोलण्यापासून कुणाला अडवावे, ही लोकशाही आहे. लोकांच्या वाट्टेल ते बोलण्यामागे प्रसिद्धी असते. माझ्याकडे इतकी संपत्ती असेल तर मला ५०० कोटी आणून द्या अन् माझी सर्व संपत्ती घेऊन जा, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा नामोल्लेख टाळत टोला मारला.

जरांगे पाटील यांच्या सभेच्या खर्चावरून भुजबळ यांनी टीका केली होती. यावर उलटवार करताना भुजबळांकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे वक्तव्य जरांगे यांनी केले होते. यावर भुजबळ यांनी त्यांचा नामोल्लेख टाळत टोला मारला.

अमृतकलश यात्रेच्या उपक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कंत्राटी भरतीवरील प्रश्नावर बोलण्यास भुजबळ यांनी नकार दिला. यापुढे कंत्राटी भरती होणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तेव्हा हा विषय आता संपला आहे, असं ते म्हणाले.

Maratha Reservation
Maharashtra Assembly: विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

खासदार संजय राऊतांनी आरोप करताना माझे नाव घेतले की नाही, याची मला काहीही कल्पना नाही. परंतु या विषयात माझा काहीही संबंध नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर उपस्थित होते.

राज्यभर गाजत असणाऱ्या ड्रग्ज निर्मिती प्रकरणावर बोलताना भुजबळ यांनी ड्रग्ज प्रकरणावर राजकारण होता कामा नये, असे सांगितले. येथे बनणारे ड्रग्ज देश-विदेशात कुठे जात होते, याचा तपास व्हायला हवा.

Maratha Reservation
SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्यांच्या उडवल्या ठिकऱ्या; इंग्लंड गुणतालिकेत आली अफगाणिस्तानच्या पंक्तीत

या प्रकरणातील आरोपी ललित पाटील कोणत्या पक्षात होता, हे देखील आपणास माहिती नाही, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. ड्रग्ज कुठपर्यंत पोहोचविले होते याची माहिती मिळवून ही साखळी तोडायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com