राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही; असं का म्हणाले भुजबळ?

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Summary

मी सगळ्यांना पुरुन उरलोय या राणेंच्या वक्तव्यावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे विद्यापीठात (Pune University) सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहुर्त आणखी पुढे ढकलला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, 3 तारखेला जयंतीदिनी आज अनावरण करावं हा आमचा प्रयत्न होता. 1 महिन्यात सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. पण काम अर्धवट राहिलं. त्यातच राज्यपालांना 1 महिना आधी कळवण शक्य नव्हतं.

उद्घाटनासाठी राज्यपालांना वेळ नाही यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, काम वेळेत पूर्ण होईल की नाही याची शश्वती नव्हती. त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिल आणि काम पूर्ण झालं नाही तर? असा प्रश्न होता. तसंच राज्यपालांनी दुसरे कार्यक्रम घेतले होते. आणखी 8 दिवस मिळताहेत त्यात चांगलं काम करु. 9 तारखेला संध्याकाळी विद्यापीठातील पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होईल अशी माहितीसुद्धा छगन भुजबळ यांनी दिली. राज्यपालांना नाव ठेवण्यात अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवलं. काम पूर्ण होईल कीं नाही याबाबत शंका होती 2 ते 4 दिवसांनी राज्यपाल येतील त्याने काही फरक पडणार नाही असंही छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आवश्यक असलेली सर्व पूर्तता शासनाच्यावतीने केलेली आहे. एका गावाची जनगणना करायची नाही, 12 कोटी जनतेची करायची आहे. कोरोनाच्या काळात लोकांनी घरोघरी जाऊन जनगणना करावी अशी इच्छा असेल तर ते लोकांसाठी अन्यायकारक असेल असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयानंतर बोलताना राणेंनी मी सगळ्यांना पुरुन उरलोय असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, नारायण राणे मोठ्या पदावर आहेत, ते केंद्राचे मंत्री आहेत. राज्य शासनाचे 50 हजार कोटी केंद्राकडे अडकून पडलेत त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. त्यांच्याकडून फार अपेक्षा उंचावल्या आहेत, मोठ्या योजना त्यांनी राज्यासाठी आणाव्यात असाही उपरोधिक टोला भुजबळांनीन लगावला.

Chhagan Bhujbal
राजकीय धुरळ्यानं समीकरण बदलणार? थेट भाजप आमदारचं अजितदादांच्या 'प्रेमात'

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले जातील का असा प्रश्न सातत्यानं विचारला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन नाहीच असं सांगितलं असलं तरी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता काही निर्बंध लागू केले जातील असं म्हटलं जातंय. दरम्यान, छगन भुजबळ यांनी म्हटलं की, एका दिवसात कोरोना रुग्णनाची संख्या झपाट्याने वाढलीय. अशावेळी लॉक डाउन करावा अशी माझी ही इच्छा नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com