Chhagan Bhujbal
esakal
मंत्री छगन भुजबळ यांनी पुजारीपणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ‘पुजारीपण करणं हा पुजाऱ्यांचा धंदा आहे,’ असं विधान त्यांनी केलं. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे आयोजित महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा संदर्भ देत आपली भूमिका मांडली.