अंजली दमानियांच्या हायकोर्टातील याचिकेवर भुजबळांची प्रतिक्रीया, म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan Bhujbal reaction to Anjali Damania  petition in the High Court

अंजली दमानियांच्या हायकोर्टातील याचिकेवर भुजबळांची प्रतिक्रीया, म्हणाले..

नाशिक : ज्या-ज्या मार्गाने इंपेरिकल डाटा (Empirical Data) गोळा होईल त्या मार्गाने तो गोळा करण्याचे काम सुरु असून आपण जो अध्यादेश काढला त्याचा बेस काय आहे, हे न्यायालय पटवून देत आहोत अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच याबाबत 17 जानेवारीला कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे देखील भुजबळ म्हणाले. (chhagan Bhujbal reaction to Anjali Damania petition in the High Court)

अंजली दमानिया प्रकरण

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra Sadan Scam) प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) विशेष न्यायालयाने या प्रकरणात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे.

याविषयी बोलताना "कुणी कोर्टात गेलं, तरी त्याची चिंता करण्याचं कारण नाही, ऍक्टिविस्ट आहेत, कुणीही कोर्टात जाऊ शकतं, त्यावर अधिक भाष्य करणार नाही" असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top