नागपूर - राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्याने महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक इच्छुकांनी आक्रमक भूमिका घेत पक्ष नेतृत्वावरच हल्ला चढविला आहे..यात छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे, संजय कुटे, रवी राणा यांच्यासह डझनभरपेक्षा अधिक नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे संख्येने अत्यल्प असलेल्या विरोधकांचा आवाज, सत्ताधारी पक्षातील नेते भरून काढत असल्याची चर्चा विधानभवन परिसरात रंगली आहे. आता नाराजांची समजूत काढण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसल्याचे चित्र आहे..राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे- पाटील यांना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणी अजित पवार, सुनील तटकरे यांना भेटण्याची गरज वाटत नसल्याचे सांगत अधिवेशन अर्ध्यावर सोडून त्यांनी थेट नाशिकचा रस्ता धरला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील मंत्रिमंडळ समावेशाबाबत प्रतिक्रिया देणे टाळत नाराजी बोलून दाखविली..भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अधिवेशन अर्ध्यावर सोडत चंद्रपूरला जाणे पसंत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाबाबत आश्र्वस्त केले होते. मंत्रिपद मिळणार नाही असे कोणीही सांगितले नाही. मात्र प्रत्यक्षात ते मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर पूर्वचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली..भाजप नेते संजय कुटे यांचे समर्थकही आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी आमदार कुटे यांनी तीन पानी पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी मंत्रिपद मिळाले नसल्याचे शल्य व्यक्त करत पक्षांतर्गत गटबाजीवर अप्रत्यक्ष भाष्य केले..तिन्ही नेत्यांची वागणूक अयोग्यशिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे यांनी मंत्रिपदावरून चांगलाच संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘मंत्रिपदाचे फारसे काही वाटत नाही. यापेक्षा तिन्ही नेत्यांनी चांगली वागणूक दिली नाही याचे वाईट वाटते. हे नेते भेटायला तयार नाहीत. मंत्रिपद मिळाले नसल्याने नक्कीच नाराज आहे. त्यामुळे अडीच वर्षांनी मंत्रिपद दिले तरी मी घेणार नाही.’.मुनगंटीवार गडकरींच्या भेटीलाराज्याचे माजी अर्थमंत्री, वनमंत्री आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळून भाजपने त्यांना जोरदार धक्का दिला आहे. यातच त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये घेण्यात आला. मुनगंटीवार यांना मंत्री होणार असल्याचे सांगण्यात आले होते..मात्र, शपथविधीच्या वेळेपर्यंत त्यांना फोन आला नाही. राजभवनात येण्याचे निमंत्रणही देण्यात आले नाही. तेव्हाच त्यांचा पत्ता कट झाल्याचे समोर आले. या सर्व पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी आज केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. गडकरी यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, पक्ष देईल ती जबाबदारी पाडेल असे त्यांनी म्हटले आहे..सुधीर मुनगंटीवार यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळालेले नाही त्यांना पक्षाने विशेष जबाबदारी देण्याचा मानस व्यक्त केला आहे. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी चालवायच्या असतात. त्यामुळे काहीवेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात तर पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. मुनगंटीवार आमच्या पक्षाचे अनुभवी नेते असून ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षदेखील राहिले आहेत.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.नाराज नेतेशिवसेना - तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, विजय शिवतारे, नरेंद्र भोंडेकर, दीपक केसरकरराष्ट्रवादी काँग्रेस - छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील.भाजप व मित्र पक्ष - सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे, कृष्णा खोपडे, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, रवी राणा (स्वाभिमान पक्ष)..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.