
मुंबई : ‘‘राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबईमध्ये मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन करत आहे. मात्र ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसीतील लहान लहान जातींचे मोठे नुकसान होईल त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा असून ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायमच असेल,’’ असे मत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले आहे.