esakal | दोन प्रकरणात न्याय मिळाला, पुढेही मिळेल! भुजबळांची बाप्पा चरणी प्रार्थना
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

दोन प्रकरणात न्याय मिळाला, पुढेही मिळेल - छगन भुजबळ

sakal_logo
By
सुमीत सावंत

मुंबई : दोन प्रकरणात न्याय मिळाला पुढे ही न्याय मिळेल, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Maharashtra Minister Chhagan Bhujbal) यांना गणपती बाप्पा पावला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra Sadan scam) छगन भुजबळ यांची गुरुवारी (ता.९) निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर आज गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी छगन भुजबळ यांनी माझगावच्या अखिल अंजीरवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशाचे भेट देत दर्शन घेतले. तसेच कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना केली.

दोन वर्षे जेलची सोडल्यास दर वर्षी इथे येतो.

दोन वर्षे जेलची सोडल्यास दर वर्षी इथे येतो. दोन प्रकरणात न्याय मिळाला पुढे ही न्याय मिळेल, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. 75 वर्षापेक्षा जास्त झाली. हे मंदिर जानेवारी 1990 साली बाळासाहेबांच्या हस्ते मंदिराचं उदघाटन झालं. शेजारच्या वाडीत लहानाचा मोठा झालोय, प्राधिकरण सगळे धडे इथेच मिळाले. इथल्या लोकांसोबतच मी सेनेत प्रवेश केला होता. यंदा कोरोना दूर व्हावा ही मागणी केली असे भुजबळांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: OBC चळवळीचा ‘आर्म' होणार ‘स्ट्राँग! राष्ट्रवादीला मिळेल बळ

४० ते ४२ वर्ष अधिक काळ गणेशोत्सव मंडळाचं अध्यक्षपद

या मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत अग्रक्रमाने प्राधान्य दिलं. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि पारसी अशा सर्वच धर्मांचे गणेशभक्त हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. विविध पक्षांचे कार्यकर्ते पक्षभेद विसरून मंडळाचे विविध कार्यक्रम-उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटत असतात. छगन भुजबळ ४० ते ४२ वर्ष अधिक काळ या लोकप्रिय गणेशोत्सव मंडळाचं अध्यक्षपद भूषवत आहेत.

ऑन केंद्रीय तपास यंत्रणा..

मागे कोर्ट म्हणालं होतं की, सीबीआय हा पपेट आहे तर आता ईडी हा दुसरा पपेट झाला आहेएवढी वर्षे राजकारणात आहे पण असा दुष्टावा आज पर्यंत कुठेच नव्हता असेही भुजबळ म्हणाले.

भुजबळांना मोठा दिलासा

एसीबी न्यायालयानं (ACB Court) छगन भुजबळ यांची केली होती. त्यानंतर न्यायालयानं सबळ पुराव्यांच्या अभावी छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आता छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: अंबासन येथील सूनबाईंच्या हाती शिर्डी संस्थानचा कारभार!

loading image
go to top