Chhath Puja 2026
esakal
छठपूजेच्या निमित्ताने आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर उत्तर भारतीय बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. काल (रविवारी) संध्याकाळी पार पडलेल्या या पूजेसाठी पिंपरी-चिंचवड शहरासह आळंदी आणि परिसरातील अनेक उत्तर भारतीय नागरिक घाटावर दाखल झाले होते. पारंपरिक पद्धतीने पूजा करत भाविकांनी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले.