Chatrapati Sambhaji Raje: छत्रपती संभाजीराजेंनी घेतील शिंदे-फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji raje

Chatrapati Sambhaji Raje: छत्रपती संभाजीराजेंनी घेतील शिंदे-फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण

Chhatrapati Sambhaji: मागील काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीची चढाओढ लागली आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात चित्रपट येत आहेत. मात्र नुकताच आलेला हरहर महादेव आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' यावरून वाद निर्माण झाला होता. (Chhatrapati Sambhaji Raj met Chief Minister Shinde and Deputy Chief Minister Devendraji Fadnavis)

हेही वाचा: Farooq Abdullah Resigns : फारुख अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; काय घडलंय जाणून घ्या

छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेवून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज संभाजीराजेंनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितस आहे की, "राज्यातील विविध विषयांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी चित्रपट बनवत असताना त्यातील ऐतिहासिक तथ्ये, परंपरांचे योग्य सादरीकरण आदी महत्त्वपूर्ण बाबी तपासण्यासाठी तज्ञ इतिहास संशोधक, अभ्यासक यांची शासकीय समिती स्थापन करावी, अशी मागणी केली. त्याच बरोबर दुर्गराज रायगडच्या जतन संवर्धन बाबत रायगड विकास प्राधिकरणाशी संबंधित कामांची सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा: Farooq Abdullah Resigns : फारुख अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; काय घडलंय जाणून घ्या

तसेच, पेण तालुक्यातील बाळगंगा धरणग्रस्तांच्या समस्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडून सविस्तर निवेदन दिले. या धरणग्रस्तांना न्याय मिळावा, त्यांची बाजू ऐकून घ्यावी याकरिता संबंधित विभागांचे मंत्री, सचिव, अधिकारी वर्ग व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत या धरणग्रस्तांची बैठक लावून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

तर कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या विकासात्मक कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदने दिली. कोल्हापूरातील ऐतिहासिक स्थळांच्या जतन संवर्धन व विकासासाठी आवश्यक निधीच्या तरतूदीची मागणी केली.

हेही वाचा- का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?