"पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही"; तेव्हाच संभाजीराजेंनी जाहीर केलं होतं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SambhajiRaje

"पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही"; तेव्हाच संभाजीराजेंनी जाहीर केलं होतं

कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे. ते आता राज्यसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या राज्यसभेच्या निवडणुकांच्या उमेदवारीवरून बरंच राजकारण पाहायला मिळतंय. दरम्यान त्यांनी पुण्यातील एका सभेत 'स्वराज्य' नावाच्या संघटनेची घोषणा केली होती. छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याचा दृष्टीकोनातून ही संघटना स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर ही संघटना राजकीय पक्ष म्हणूनही राजकारणात उतरू शकते असं त्यांनी सांगितलं होतं. पण आजपासून आठ वर्षापूर्वी त्यांनी आपण यापुढे कधीच निवडणुका लढवणार नाहीत अशी घोषणा केली होती.

SambhajiRaje

SambhajiRaje

राज्यसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या रणधुमाळीच्या तोंडावर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य नावाची संघटना स्थापन केली. त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात येत होती पण काही अटी आणि शर्तींमुळे संभाजीराजे आपल्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. हा सगळा रणसंग्राम आणि राजकारण चालू आहे पण आठ वर्षापूर्वी संभाजीराजे यांनी कोल्हापूरातील एका सभेत आपण यापुढे कधीच निवडणुक लढवणार नाहीत अशी घोषणा केली होती.

२०१४ च्या निवडणुका जवळ आल्या होत्या. कोल्हापूरचे तात्कालीन गृहमंत्री सतेज पाटील यांनी कंजारभट समाजाला स्मशानभूमी मिळवून दिली होती. त्यावेळी स्मशानभूमीच्या लोकार्पणासाठी छत्रपती संभाजी राजे यांचा सत्कार करण्यात आला होता. त्या समारंभावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने राज्यभर वातावरण निर्मिती करणारे छत्रपती संभाजी राजे यांनी आपण निवडणुका लढवणार नसल्याचं या कार्यक्रमावेळी स्पष्ट केलं होतं.

मराठा आंदोलन आणि संभाजीराजे

मराठा आंदोलन आणि संभाजीराजे

त्याअगोदर संभाजी राजेंनी २००९ साली लोकसभेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. धनंजय महाडिक यांनी ऐनवेळी उमेदवारी नाकारून संभाजी राजे यांना दिली होती कारण महाडिक यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील पाच आमदारांनी विरोध दर्शवला होता. मात्र राजर्षी शाहू महाराजांच्या या वारसाला तत्कालीन अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांनी आव्हान निर्माण केलं आणि संभाजीराजेंना या निवडणुकांत हार पत्करावी लागली होती. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी त्यांनी आपण निवडणुका लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यांनी आता पुन्हा राजकारणात भाग घेण्याचं ठरवलं असून राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अपक्ष लढण्याची तयारी केलीय.

Web Title: Chhatrapati Sambhajiraje Says I Will Never Run Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top