
Aurangzeb: छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज (पहिले) आणि महाराणी येसूबाई हे मुघलांच्या तावडीमध्ये सापडले. राजाराम महाराजांना दक्षिणेत परागंदा व्हावे लागले होते. तरीही मराठे तग धरुन लढत होते, नेटाने मुघलांना मागे रेटत होते. त्यामुळेच औरंगजेबाने कधीही येसूबाईंचा आणि शाहू राजांचा छळ केला नाही.
शाहू महाराजांवर अत्याचार झाले नाहीत, त्याला कारण औरंगजेबची थोरली मुलगी झेबुनिस्सा हीदेखील आहे. ती शाहू राजांवर मुलाप्रमाणे प्रेम करायची. शिवाय ती सहृदयी, कवी मनाची होती. त्यामुळे ती कट्टरतेपासून दूर होती. जेव्हा औरंगजेबाने शाहू राजांवर धर्मपरिवर्तनसाठी दबाव वाढवला, तेव्हा हीच झेबुनिस्सा मदतीला धावली.